पोलिसांकडून गरजूंना सांगली दि. ८ - कोरोना विषाणूच्या अनुषंगाने दिनांक २४/ ३/२०२० पासून २१ दिवसासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूने उग्र रुप धारण करुन सर्वत्र थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने सर्वत्र या साथीच्या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिस अधिकारी कर्मचारी पाँईट नेमून नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरुन कामाकरीता आलेले ऊस तोडणी कामगार, मजूर सांगलीतच अडकून राहिले आहेत, त्याचे काँन्ट्रक्टर हे त्यांनी सोडून गेल्यामुळे, संचारबंदीमध्ये त्यांना आपल्या गावाकडे जाता येत नाही, परजिल्ह्यातून , परराज्यातून ऊस तोडणी करीता आलेले लोक हे तासगांव पोलिस ठाणेच्या हद्दीत व विटा पोलिस ठाणेच्या हद्दीत, विटा, भाळवणी, ढवळेश्वर येथे ठिकठिकाणी झोपडी बांधून राहिले आहेत , संचार बंदीमुळे त्यांना रोजगार नसल्याने उपासमार होत आहे व हे मजूर लोक परजिल्क्यातून, परराज्यातील असल्यामुळे त्यांचेकडे लक्ष कोण देत नाही हे पोलिस अधिक्षक श्री सुहेल शर्मा सांगली यांचे लक्षात येताच त्यांनी पोलिस निरीक्षक पिंगळे यांना अत्यावश्यक वस्तू देण्याबाबत सूचित केले, याप्रमाणे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व त्यांचेकडील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परजिल्ह्यातून, परराज्यातील आलेल्या मजूर लोक यांचे ८५ कुटुंबियांना आवश्यक त्या रेशनिंग वस्तु देण्यात आले.
पोलिसांकडून गरजूंना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप