कर्करोगावर मात केलेल्या डॉ. जयश्री सावंत यांचेकडून कोरोनाग्रस्तांसाठी १७ हजाराची मदत

सांगली दि. ८ (प्रतिनिधी) ज्यांना कर्करोग झाला होता, त्या आज ठणठणीत आहेत, त्यांच्यावरील शस्त्रक्रियेला मंगळवारी सतरा वर्षे झाली, त्या आठवणी जागवत त्यांनी कोरोना विरोधी लढाईसाठी राज्य शासनाच्या निधीत ऑनलाईन सतरा हजार रुपयांची मदत वर्ग केली. एका मोठ्या आजाराशी मी लढले, जिकले, आपण कोरोनाशी लढून जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, डॉ, जयश्री सावंत त्यांचे नाव, येथील पटेल चौकात त्या राहतात. डॉ. जयश्री सावत यांनी सतरा हजार रुपयांचा धनादेश लिहला, मात्र तो जिल्हाधिकाऱ्याकडे द्यायला जाण्याऐवजी ऑनलाईन पैसे पाठवावेत, असा निर्णय त्यांनी घेतला. काल त्यांनी मदत निधी वर्ग केला, त्यांना सतरा वर्षापूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले, जगण्यासाठी लढाई सुरु झाली, ७ एप्रिल रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ती यशस्वी झाली, त्यांनी ही लढाई जिंकली, आज त्या ठणठणीत आहेत आणि सामाजिक कार्याला त्यांनी झोकून दिले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या यशस्विनी मोहिमेचा त्या महत्वाचा भाग आहेत, त्यांच्या आई श्रीमती लिलाताई जाधव या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ महिला नेत्या असून बहिण छायाताई जाधव याही जिल्हा महिला राष्ट्रवादीत आघाडीवर काम करत आहेत, डॉ. सावंत म्हणाल्या, हा निधी वर्ग करताना एक वेगळे समाधान लाभले, संकट कुणावरही येऊ शकते, अशावेळी आपणास शक्य तितकी मदत देता आली पाहिजे, मी कर्करोग झाल्यानंतर सतरा वर्षे जगले, या समाजाचे, वैद्यकीय सेवेच माझ्यावर कर्ज आहे, त्यातून थोडीसी उतराई होण्याचा प्रयत्न मी केला आहे.